
LORD RAMA'S YOUNGER BROTHER SHRI LAKSHMAN SERIOUSLY INJURED IN WAR BY DEMON RAVANA'S SON INDRAJIT. SHRI LAKSHAMAN WENT IN COMA. VAIDYA(DR.) OF RAVANA SUSHENA ADVICE LORD RAMA TO TOOK SANJIVANI (HERB MEDICINE) FROM HIMALAYA BEFORE SUNSHINE. LORD RAMA APPOINTED LORD HANUMAN FOR THE GREAT TASK. IMMEDIATELY LORD HANUMAN WENT TO HIMALAYA BY AIR WHERE HE COULDNOT IDENTIFY SANJIVANI HENCE HE LIFTED MOUNTAIN DRONAGIRI AND TRAVELLED TO LANKA. WHILE TRAVELLING TO LANKA ONE OF THE PART OF THE MOUNTAIN FELT DOWN AT SATARA CITY. IT IS CALLED JARANDESHWAR MOUNTAIN. AT THE BOTTOM OF THE MOUNTAIN MAHULI VILLEGE SITUATED. THE PLACE BECAME HOLY PLACE KSHETRA MAHULI.


क्षेत्र माहुली हे न्यायमूर्ती श्री राम शास्त्री प्रभुणे यांचे जन्मगाव। हे चौथा बाजीराव पेशवे ( १७६१ ते १७७२ ) यांच्या काळात न्यायाधीश होते। अजुनही त्यांच्या स्मृति गावाने जपून ठेवल्या आहेत।

श्रीब्रह्मदेव मंदिर तसेच जैन मंदिरही आहे। हे मंदिर १७०० साली बांधले। श्री परशुराम नारायण अनगळ यांनी घाट बांधला। व त्याच्या बाजुचा घाट शेवटचा दुसरा बाजीराव यांनी ( १७९६ ते १८१७ ) बांधला । तो अर्धवट बांधलेल्या अवस्थेत आहे।

संगम माहुलीत पहिला पेशवा श्री परशुराम त्रम्बक कुलकर्णी यांची समाधी (१६९७ ते १७१८ ) । हे पेशवे पराक्रमी होते। परन्तु अल्पायुषी होते।

ह्या क्षेत्रमाहुलीची महती पुरातन कालापासून प्रसिद्ध आहे। श्री परशुराम देवाने श्रीकृष्णाला आणि बलराम यांना 'दुर्ग नीतीचा' उपदेश केला। आणि नंतर दोघांनी जरासंध राक्षसाचा वध केला। हा उपदेश श्री भगवान परशुरामाने पिंपळाच्या झाडाखाली बसून केला। शिवाजीराजे यांचे राजकीय गुरु संत श्री रामदास स्वामी यांचे वास्तव्य काही काळ क्षेत्र माहुलीत होते। त्यांची एक गोष्ट सांगितली जाते की संत श्री रामदास स्वामींनी एक गोटा श्री चावरे यांच्या पुर्वजांना दिला आणि तो गोटा सोन्याचा झाला। संत श्री रामदास स्वामी यांचे जेष्ठ बंधूंचे नातू श्री गंगाधरस्वामी हे चावरे यांच्या घरी आले होते असा उल्लेख श्री हनुमान स्वामी बखरीत आहे.

स्वातंत्र्यानंतर कृष्णा बाई उत्सव प्रथम श्री दामोदर गोविन्द चावरे यांच्या घरी सम्पन्न झाला। त्यांच्या साथीला श्री अराणके, सामक, देव, प्रभुणे यांनी सुरवात केली। भाविकांना डाळ, पन्हे प्रसाद देण्याची प्रथा चालू केली। ह्याच दिवशी श्री नरसिंह जयंती साजरी करतात।

दूर गावातून दर्शनासाठी येणारे तसेच कृष्णा उत्त्सवात सहभागी होणा-यांची सोय ह्या श्रीमती आनंदीबाई गिजरे सांस्कृतिक भवनात होते।

संगम माहुली उत्सव रथ ह्या रथाची चाके औंध संस्थानिकांकडून आणली आहेत.
हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या अस्थि येथे विसर्जित केल्या।

श्री काशिविश्वेश्वर मंदिर
श्री कशिविश्वेश्वर मंदिर हे श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध यांनी १७४० मधे बांधले। प्रत्येक मंदिराचे बांधकाम सुरेख, सुन्दर आणि कलात्मक आहे। एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की त्या काळात सुन्दर इमारती आणि मंदिरे बनवण्याची कला आजच्या इन्जीनीअरला देखिल अवगत नाही।
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी श्री नरसिंहदेवला डाळ आणि पन्हे हा प्रसाद करतात।
श्री नरसिंह आणी श्री दत्त या देवांचा निवास कृष्णातीरी असतो. श्री नरसिंहाची बहुसंख्य मंदिरे कृष्णातीरी आहेत. कृष्णा नदीमुळे अनेक लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले आहे. सजीवांना जीवन देणारी ही नदी महाराष्ट्रातून वाहत आंध्रप्रदेश पर्यंत पसरली आहे.
श्री नरसिंह
दैत्य मातला थयथयाट केला, नाकीदम केले विश्वाला
सुरवर जिंकले वेठीस धरले, जिंकून घेतले
धर्माला II
थरथरली धरणी नरनारी पळती, आळवू लागले
देवाला
स्वस्थ प्रल्हाद निश्चल शांत, कसली भीती
त्या भक्ताला II
हरीनाम मुखात अखंड घेवूनी, स्तुती
सुमनांची फुले उधळूनी
म्हणे देवाधिदेवा तुच एक दाता, अंत ना
पाही ये लवकर आता II
अंतरीची हाक ऐकुनी, भक्तासाठी आला धावुनी
हादरून गेले त्रैलोक्य, संभ्रमात पडला
कैलास II
नक्षत्रेही तडतड करती, उजळून गेले आसमंत
कडकड करीत खांब तडकला, प्रगटला नरसिंह II
उग्र रूप पाहता छाती धडकली, दैत्यसेना
पाठी सरकली
घट्ट जखडला आडवा केला, मांडीवर
हिरण्यकश्यपुला II
विदाराला दैत्य, बंधन मुक्त केले
विश्वाला
भक्तासाठी धावुन आला, तडा न जाई श्रद्धेला II
श्री शिरकाईदेवी
निसर्गरम्य मनोहरी दृश्य

श्री बिल्वेश्वर मंदिर
हे मंदिर श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध यांनी १७४२ साली बांधले। ह्या मंदिराचे मुख्य कार्यकारी श्री चावरे होते। व मंदिराची व्यवस्था बघत। त्रिपुरारी पौर्णिमेला तेलाचे दिवे लावत असत.
स्वयंभू गणपतीची पूजा श्री दामोदर चावरे करत होते। रोजची संध्या येथेच करायचे।
श्रीकृष्ण

महादेव मंदिर
येथे कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा संगम होतो। वेण्णा नदी ही शिवस्वरूप आहे व कृष्णानदी विष्णुस्वरूप आहे। दोन्ही नद्यांचे मिलन येथे झाले म्हणून याला संगम माहुली नाव पडले।
हे मंदिर श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी,औंध यांनी १७४० साली बांधले।
क्षेत्र माहुली हे गाव कृष्णा तीरावर वसले आहे। त्याच्या पैलतीरावर संगम माहुली आहे।
गटारी अमावास्येला शिव्या देण्याची प्रथा होती. गावातील माणसे पैलतीरावरच्या गावातील माणसांना शिव्या देत आणी आनंद लुटत असत.
महाबळेश्वर श्रीकृष्ण नदी उगमस्थान
तालीमीत रोज व्यायामसाठी मुले येत.
येथे वेदपठन शिकण्यासाठी मुले येत असत.
संगमेश्वर देऊळ

दक्षिण भारताची पाताळगंगा म्हणजेच कृष्णा नदी होय .हिच्याबद्दल पुराणामध्ये अशी गोष्ट आहे कि 'प्राचीन काळी ब्रह्मदेवाने ब्र्ह्मारण्यात यज्ञ केला .या यज्ञाला तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश उपस्थित होते यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सावित्री साज शृंगार करण्यात गुंतल्यामुळे वेळेवर आली नाही म्हणून गायत्रीला प्राधान्य दिल्यामुळे सावित्रीला राग आला व तिने तीनही देवाना शाप दिला कि तुम्ही सर्व जळरूप व्हाल. तिच्या शापानुसार विष्णू झाले कृष्णा नदी, ब्रह्मा झाले कोयना नदी तर महेश झाले वेण्णा नदी. तीनही देवानी त्यांनाही प्रतिशाप दिला कि तुम्ही जळरूप व्हाल व अधोगतीला जाल. त्या प्रतिशापानुसार सावित्री,गायत्री,वाशिष्टी ई. देवता जळरूप होऊन सह्याद्रीवरून उगम पावून कोकणात वाहू लागल्या. महाबळेश्वरला पाच नद्या उगम पावतात. कृष्णा, कोयना, वेण्णा या तीन नद्या देशावर येतात, तर गायत्री व सावित्री उंचावरून खाली तळ कोकणात वाहतात. म्हणजेच अधोगतीला जातात. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम श्री क्षेत्र माहुली येथे होतो, म्हणजेच हरी हर संगम. विष्णू रूपिणी कृष्णा व शिव रूपिणी वेण्णा म्हणजे हरिहर संगम झाला असे मनात खंत वाटून ब्रह्मरूपिणी कोयना वेगाने कृष्णेला कराड येथे मिळते. कृष्णा संथ या उलट कोयना वेगवान यांचा 'T' आकाराचा संगम कराड येथे होतो यालाच प्रीती संगम असे म्हणतात. हि पुराणातली गोष्ट म्हणजे भौगोलिक नकाशाच आहे. या रूपकात्मक गोष्टी मधून भौगोलिक सत्य दिसून येते.
IT IS A BEAUTIFUL PLACE IN SATARA. I LIKE SUCH PLACE VERY MUCH.
ReplyDeletehya gavacha motha itihas ahe. hya gava madhe anek brahman rahat asat. mandira madhe roj puja hot ase. ase kya zala ki sagale brahman gavatun nighun gele.
ReplyDeleteawasome nature & siva mandir
ReplyDeleteThanks,
ReplyDeleteखूपच सुंदर मुद्देसूद आणि ऐतिहासिक माहिती मिळाल्यामुळे मला माझा पाऊलवाटा ब्लॉग लिहिला खूप सोपा झाला.
ReplyDeleteमाहुलीमधील चावरे या आडनावाचे काही तपशील उपलब्ध होऊ शकतील का ?
ReplyDeleteकिंवा त्यासाठी कोणाशी संपर्क करता येऊ शकेल?
खूप छान माहिती दिली आहे
ReplyDeleteखूप छान माहिती उपयुक्त ऐतिहासिक माहिती ---सोनंदकर गोपाळ गजानन
ReplyDeleteमाझे आजोबा वासुदेवराव कुंभारे -राज वैद्य होते -- न ते राजे लोकांचा १०/१२. विधीही करत असत ---गोपळ सोनंदकर
ReplyDelete