Monday, June 21, 2010

कृष्णाबाई





































THIS PILIGRIM CENTRE IS ON THE BANK OF KRUSHNA RIVER AND VENNA RIVER ABOUT 6 KM FROM HISTORICAL CITY SATARA.TEMPLES OF HINDU DEITIES LIKE KASHIVISHESHWAR , BILVESHWAR , SANGAMESHWAR AND RAMESHWAR ARE BUILT BY SHRIPATRAO PANTAPRATINIDI OF AUNDH PRINCELY STATE.
































































































































































































































































































































क्षेत्र माहुली तीर्थक्षेत्र सातारा शहरापासून ६ किलोमीटर आहे . सातारा रेल्वे स्टेशन पासून फक्त अर्धा किलोमीटर आहे. पोवई नाक्या पासुन रिक्षा व बस मिळते.




















                        



















क्षेत्र माहुली वर्णन
माहुली गाव पवित्र असे हो क्षेत्र कृष्णातीर/ गाव असे उंचावर/ राष्ट्रात नाव गाजले/ स्मरण राहिले विद्वानांचे रामशास्त्री प्रभूण्यांचे /तीराला घाट सुंदर रामेश्वर संगमेला तीरी वसे बिल्वेश्वर/ मन ध्यास होऊ निजा मिजा बद्रीनारायण तो पहा/ ते स्थळ असे निर्मळ नका करू वेळ निघा नाही तिथे क्लेश चिंता/ कृष्णा वेळणा वरुनी आली/ आनंदली पितांबर ल्याली मनोहर /असे हो क्षेत्र कृष्णातिर //१//
नागेश महाराजा वसती/ भक्ता सांगती आत्मज्ञान/ नाथुशास्त्रींचे पाहती मन/ नसे अंत दिसती बघा/ मुळचे निर्गुण ब्रम्ह कुळीचे /भागवत सप्तकार ग्रंथ हा थोर आज्ञा केली/ ती प्रथा चालु झाली/ १९१० साली सुरवात केली/ वाचण्याची आहे तयारी/ हयातीची स्थळ सुशोभित हो किती /हो किती/ कृष्णाबाई पुढे वाहती/ वाहती/ लोकांची भक्ती हो अंती/ हो अंती/ ती वाणी प्रेमळ किती/ लोक हो ऐकती स्तुती हो करिती घरोघर //२//
आंब्याचे तोरण बांधिले/ खांब सजविले कर्दळीचे/ तिथे आसन शास्त्रीजींचे/ आधी पुजन गणपतीचे करी ग्रंथाचे नमन झाले धेनुसह कृष्ण आले/ श्री तुळस पुढे ठेविती/ नारळ अर्पिती /श्रोतेजन येती दर्शनासी/ ते बसले सप्ताहासी/ प्रल्हादाचा छळ तो झाला/ कश्यपुवधाला/ नारळ फुटला/ नरसिंहाला हा दिन तिसरा आला /चार दिवस ग्रंथ ऐकिला/ ऐकिला /तो गोवर्धन सजविला/ सजविला/ नारळ करू वधाला/ वधाला /गोपाळांचा गोपाळकाला गोड हो झाला/ घरोघरीच्या वस्तु आणिल्या/ कृष्णा अर्पिल्या /शिदोरी आली सुदाम्याची/ कृष्ण बोले रुख्मिणीसी/ काल्याची शोभा वर्णिती/ देव ऐकती/ स्तुती ऐकती /स्वर्गावर //३//
नाथुशास्त्री पंडिताची/ गोडी वर्णनाची अनिवार वाटे ऐकावी वारंवार/ श्रोत्यांना पाजी अमृत वाटे धन्यता जीवनाची/ द्या शक्ती पचविण्याची/ फुलांचे हार घालती/ दीप लाविती/ शोभा हो किती दिसे फार/ विठ्ठल रखुमाई पाटावर/ नाना पारिका रंगवलेल्या वेलिका/ उदबत्ती करपूर दीपिका/ दीपिका/ नैवेद्याला प्रिय कृष्णाला दुध शकरी पेला भरीला नारळ प्रसादाला/ करी त्यांना नमस्कार वारंवार मस्तकावर ठेवी कर/ हे क्षेत्र कृष्णातिर //४//
राहिले दोन दिवस मनी उल्हास श्रोती यांच्या दिन आला समाप्तीचा/ वाचता आळस नाही कुठे हो कधी/ मन निग्रही पंडितांचे/ अनुग्रही महाराजांचे प्रासादिक वाणी गोड/ लाविले वेद सप्ताहाचे/ दिन गेले आनंदाचे/ चाले आरती/ जन हो येती मिरवत नेती /वाजे वाजंत्री आनंदले आशीर्वाद सर्वा दिधले /कित्येकांनी आहेर केले/ दांपत्य पुजीयेले/ पुजीयेले/ विडा दक्षिणा बोळविले/ बोळविले/ आशीर्वाद एकची हवा उभयंता द्यावा/ भक्तीचा वर द्यावा/ हे क्षेत्र कृष्णातिर //५//

कृष्णाबाई उत्सवाची मुहूर्तमेढ क्षेत्र माहुलीचे इनामदार दामोदर गो चावरे यांनी स्वातंत्र्यानंतर रोवली. चार वर्षे कृष्णाबाई उत्सव यांनी स्वतःच्या घरात चालू केला.




































































Wednesday, June 16, 2010

माहुली उत्सव




























वेदव्यास रचित स्कंद पुराणातील सह्याद्री खंडातील कृष्णा महात्म्य अंतर्गत माहुली गावाची महती सांगीतलेली आहे.

































क्षेत्रमाहुली रथ

राम नवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीला भैरोबाची जत्रा भरते। भैरोबाचे मंदिर १७७० साली बांधले आणि कृष्णाबाई व कृष्णेश्वर मंदिर १७५४ व १७९० साली कृष्ण दीक्षित चिपळूणकर यांनी बांधले।

राजा शाहू (१७०७ ते १७४९) यांच्या इमानी कुत्र्याची समाधी माहुलीत आहे।














Saturday, June 12, 2010

क्षेत्र माहुली


LORD RAMA'S YOUNGER BROTHER SHRI LAKSHMAN SERIOUSLY INJURED IN WAR BY DEMON RAVANA'S SON INDRAJIT. SHRI LAKSHAMAN WENT IN COMA. VAIDYA(DR.) OF RAVANA SUSHENA ADVICE LORD RAMA TO TOOK SANJIVANI (HERB MEDICINE) FROM HIMALAYA BEFORE SUNSHINE. LORD RAMA APPOINTED LORD HANUMAN FOR THE GREAT TASK. IMMEDIATELY LORD HANUMAN WENT TO HIMALAYA BY AIR WHERE HE COULDNOT IDENTIFY SANJIVANI HENCE HE LIFTED MOUNTAIN DRONAGIRI AND TRAVELLED TO LANKA. WHILE TRAVELLING TO LANKA ONE OF THE PART OF THE MOUNTAIN FELT DOWN AT SATARA CITY. IT IS CALLED JARANDESHWAR MOUNTAIN. AT THE BOTTOM OF THE MOUNTAIN MAHULI VILLEGE SITUATED. THE PLACE BECAME HOLY PLACE KSHETRA MAHULI.




























क्षेत्र माहुली हे न्यायमूर्ती श्री राम शास्त्री प्रभुणे यांचे जन्मगाव। हे चौथा बाजीराव पेशवे ( १७६१ ते १७७२ ) यांच्या काळात न्यायाधीश होते। अजुनही त्यांच्या स्मृति गावाने जपून ठेवल्या आहेत।




























श्री रामेश्वर मंदिर
श्रीब्रह्मदेव  मंदिर तसेच जैन मंदिरही आहे। हे मंदिर १७०० साली बांधले। श्री परशुराम नारायण अनगळ यांनी घाट बांधला। व त्याच्या बाजुचा घाट शेवटचा दुसरा बाजीराव यांनी ( १७९६ ते १८१७ ) बांधला । तो अर्धवट बांधलेल्या अवस्थेत आहे।








संगम माहुलीत पहिला पेशवा श्री परशुराम त्रम्बक कुलकर्णी यांची समाधी (१६९७ ते १७१८ ) । हे पेशवे पराक्रमी होते। परन्तु अल्पायुषी होते।












सातारा हे दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे। येथे अनेक तीर्थक्षेत्रे आहेत। माहुली क्षेत्र त्यातले एक गाव। हे गाव जरंडेश्वर च्या पायथ्याशी वसले आहे। ह्या गावात अनेक दशग्रंथी ब्राह्मण  रहात होते। हे औंध संस्थानिकांचे गाव होते। येथील बहुसंख्य मंदिरे औंधचे पंतप्रतिनिधी यांनी १८०० मध्ये बांधली। येथे एक ब्रह्माचे मंदिरही आहे।
ह्या क्षेत्रमाहुलीची महती पुरातन कालापासून प्रसिद्ध आहे। श्री परशुराम देवाने श्रीकृष्णाला आणि बलराम यांना 'दुर्ग नीतीचा' उपदेश केला। आणि नंतर दोघांनी जरासंध राक्षसाचा वध केला। हा उपदेश श्री भगवान परशुरामाने पिंपळाच्या झाडाखाली बसून केला। शिवाजीराजे यांचे राजकीय गुरु संत श्री रामदास स्वामी यांचे वास्तव्य काही काळ क्षेत्र माहुलीत होते। त्यांची एक गोष्ट सांगितली जाते की संत श्री रामदास स्वामींनी एक गोटा श्री चावरे यांच्या पुर्वजांना दिला आणि तो गोटा सोन्याचा झाला। संत श्री रामदास स्वामी यांचे जेष्ठ बंधूंचे नातू श्री गंगाधरस्वामी हे चावरे यांच्या घरी आले होते असा उल्लेख श्री हनुमान स्वामी बखरीत आहे.



स्वातंत्र्यानंतर कृष्णा बाई उत्सव प्रथम श्री दामोदर गोविन्द चावरे यांच्या घरी सम्पन्न झाला। त्यांच्या साथीला श्री अराणके, सामक, देव, प्रभुणे यांनी सुरवात केली। भाविकांना डाळ, पन्हे प्रसाद देण्याची प्रथा चालू केली। ह्याच दिवशी श्री नरसिंह जयंती साजरी करतात।

















दूर गावातून दर्शनासाठी येणारे तसेच कृष्णा उत्त्सवात सहभागी होणा-यांची सोय ह्या श्रीमती आनंदीबाई गिजरे सांस्कृतिक भवनात होते।










संगम माहुली उत्सव रथ ह्या रथाची चाके औंध संस्थानिकांकडून आणली आहेत.

हिंदुहृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या अस्थि येथे विसर्जित केल्या।















श्री काशिविश्वेश्वर मंदिर
श्री कशिविश्वेश्वर मंदिर हे श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध यांनी १७४० मधे बांधले। प्रत्येक मंदिराचे बांधकाम सुरेख, सुन्दर आणि कलात्मक आहे। एक गोष्ट लक्षात येण्यासारखी आहे की त्या काळात सुन्दर इमारती आणि मंदिरे बनवण्याची कला आजच्या इन्जीनीअरला देखिल अवगत नाही।

















नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी श्री नरसिंहदेवला डाळ आणि पन्हे हा प्रसाद करतात।


श्री नरसिंह आणी श्री दत्त या देवांचा निवास कृष्णातीरी असतो. श्री नरसिंहाची बहुसंख्य मंदिरे कृष्णातीरी आहेत. कृष्णा नदीमुळे अनेक लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले आहे. सजीवांना जीवन देणारी ही नदी महाराष्ट्रातून वाहत आंध्रप्रदेश पर्यंत पसरली आहे.









श्री नरसिंह
दैत्य मातला थयथयाट केला, नाकीदम केले विश्वाला
सुरवर जिंकले वेठीस धरले, जिंकून घेतले धर्माला II
थरथरली धरणी नरनारी पळती, आळवू लागले देवाला
स्वस्थ प्रल्हाद निश्चल शांत, कसली भीती त्या भक्ताला II
हरीनाम मुखात अखंड घेवूनी, स्तुती सुमनांची फुले उधळूनी
म्हणे देवाधिदेवा तुच एक दाता, अंत ना पाही ये लवकर आता II
अंतरीची हाक ऐकुनी, भक्तासाठी आला धावुनी
हादरून गेले त्रैलोक्य, संभ्रमात पडला कैलास II
नक्षत्रेही तडतड करती, उजळून गेले आसमंत
कडकड करीत खांब तडकला, प्रगटला नरसिंह II
उग्र रूप पाहता छाती धडकली, दैत्यसेना पाठी सरकली
घट्ट जखडला आडवा केला, मांडीवर हिरण्यकश्यपुला II
विदाराला दैत्य, बंधन मुक्त केले विश्वाला
भक्तासाठी धावुन आला, तडा जाई श्रद्धेला II








श्री शिरकाईदेवी

















निसर्गरम्य मनोहरी दृश्य





















श्री बिल्वेश्वर मंदिर
हे मंदिर श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी, औंध यांनी १७४२ साली बांधले। ह्या मंदिराचे मुख्य कार्यकारी श्री चावरे होते। मंदिराची व्यवस्था बघत। त्रिपुरारी पौर्णिमेला तेलाचे दिवे लावत असत.











स्वयंभू गणपतीची पूजा श्री दामोदर चावरे करत होते। रोजची संध्या येथेच करायचे।






















   श्रीकृष्ण
























श्री संगमेश्वर
महादेव मंदिर
येथे कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा संगम होतो। वेण्णा नदी ही शिवस्वरूप आहे कृष्णानदी विष्णुस्वरूप आहे। दोन्ही नद्यांचे मिलन येथे झाले म्हणून याला संगम माहुली नाव पडले। हे मंदिर श्री श्रीपतराव पंतप्रतिनिधी,औंध यांनी १७४० साली बांधले।







क्षेत्र माहुली हे गाव कृष्णा तीरावर वसले आहे। त्याच्या पैलतीरावर संगम माहुली आहे।
गटारी अमावास्येला शिव्या देण्याची प्रथा होती. गावातील माणसे पैलतीरावरच्या गावातील माणसांना शिव्या देत आणी आनंद लुटत असत.





तालीमीत रोज व्यायामसाठी मुले येत.





येथे वेदपठन शिकण्यासाठी मुले येत असत.


संगमेश्वर देऊळ








महाबळेश्वर श्रीकृष्ण नदी उगमस्थान  




दक्षिण भारताची पाताळगंगा  म्हणजेच कृष्णा नदी होय .हिच्याबद्दल पुराणामध्ये अशी गोष्ट आहे कि 'प्राचीन काळी ब्रह्मदेवाने ब्र्ह्मारण्यात यज्ञ केला .या यज्ञाला तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश उपस्थित होते यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी सावित्री साज शृंगार करण्यात गुंतल्यामुळे वेळेवर आली नाही म्हणून गायत्रीला प्राधान्य दिल्यामुळे सावित्रीला राग आला व तिने तीनही देवाना शाप दिला कि तुम्ही सर्व जळरूप व्हाल. तिच्या शापानुसार विष्णू झाले कृष्णा नदी, ब्रह्मा झाले कोयना  नदी तर महेश झाले वेण्णा नदी. तीनही देवानी त्यांनाही प्रतिशाप दिला कि तुम्ही जळरूप व्हाल व अधोगतीला जाल. त्या प्रतिशापानुसार सावित्री,गायत्री,वाशिष्टी ई. देवता जळरूप होऊन सह्याद्रीवरून उगम पावून कोकणात वाहू लागल्या. महाबळेश्वरला पाच नद्या उगम पावतात. कृष्णा, कोयना, वेण्णा या तीन नद्या देशावर येतात, तर गायत्री व सावित्री उंचावरून खाली तळ कोकणात वाहतात. म्हणजेच अधोगतीला जातात. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम श्री क्षेत्र माहुली येथे होतो, म्हणजेच हरी हर संगम. विष्णू रूपिणी कृष्णा व शिव रूपिणी वेण्णा म्हणजे हरिहर संगम झाला असे मनात खंत वाटून ब्रह्मरूपिणी कोयना वेगाने कृष्णेला कराड येथे मिळते. कृष्णा संथ या उलट कोयना वेगवान यांचा 'T' आकाराचा संगम कराड येथे होतो यालाच प्रीती संगम असे म्हणतात. हि पुराणातली गोष्ट म्हणजे भौगोलिक नकाशाच आहे. या रूपकात्मक गोष्टी मधून भौगोलिक सत्य दिसून येते.